Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ सरसकट देण्यात यावा प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांचे निवेदन

 


लकापूर- दिव्यांग बांधव व संजय गांधीमध्ये येत असलेल्या नागरिकांना अंत्योदय योजनेचा लाभ हा सरसकट देण्यात यावा अशी मागणी आज २० जुलै रोजी तहसीलदार मलकापूर यांच्याकडे प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप यांच्या नेतृत्वात प्रहार जनशक्ती पक्ष अंपग क्रांतीच्या पदाधिकार्यांनी केली.

दिव्यांग बांधव व संजय गांधी मध्ये येत असलेल्या नागरिकांकडे शासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण  झाली आहे. आधीच कोरोनामुळे हवालदिल झालेले नागरिक आता कुठे आपले जनजीवन सुरळीत करत असून त्यांच्या सर्व अपेक्षा प्रशासनावर असतात. परंतु प्रशासन त्यांना वेळोवेळी मदत न करता शासन ही मदत थांबवत असून व रोज नवीन अटी व शर्ती लावत असून त्यांच्या उपासमारीची वेळ येते. या सर्व बाबी लक्षात घेऊन प्रशासनाने त्यांना वेळेवर मदत करावी.
दिव्यांग बांधव व संजय गांधी योजना मध्ये लाभार्थी असलेल्या नागरिकांना शासनाने वेळोवेळी मदत करावी व त्यांना शासना मार्फत मिळत असलेल्या राशन वरील सर्व जाचक अटी या कायमस्वरूपी रद्द करण्यात याव्या व शासनाने संजय गांधी या सरकारी योजना अंतर्गत येत असलेल्या लाभाथ्र्यांना शासनाने दर महिना ठरवून दिलेली रक्कम त्यांच्या खात्यात न चुकता वेळोवेळी टाकावी यासह आदी मागण्यांसाठी आज २० जुलै रोजी  तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपप्रमुख अजय टप, अपंग क्रांती तालुका अध्यक्ष राहुल तायडे, महिला तालुका अपंग क्रांती शुभांगी डवले, तालुका प्रमुख अजित पुंâदे, बलराम बावस्कर, अशोक गाढवे, निलेश चोपडे यासह आदी उपस्थित होते.