रोजगार हमी योजनेतून शेतात मोहगुणी वृक्ष लागवडीचे अनुदान मंजुरीसाठी लाभार्थ्याकडून १५ हजारांची आर्थिक लाच स्वीकारताना पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिका-याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी पकडले. कैलास तुकाराम जाधव वय- ५७ वर्ष, पद- सहाय्यक गटविकास अधिकारी रा.न्यू हनुमान नगर सिडको औरंगाबा नाव आहे. पंचायत समितीत गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळयात सापडल्यामुळे स्थानिक प्रशासनातील अधिकारी कर्मचारी वर्गात मोठी खळबळ उडाली.निवृतीला अवघे वर्ष शिल्लक असताना गटविकास अधिकारी लाचलुचपत विभागाच्या सापळयात अडकले.
मागील दोन महिन्या पासून सहाय्यक गटविकास अधिकारी जाधव यांच्याकडे पंचायत समितीचा बीडीओ पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेला होता. रोजगार हमी योजनेतून मोहगुणी वृक्ष लागवड योजनेतील अनुदान मंजूरीसाठी त्यांनी ३२ वर्षीय लाभार्थ्यांकडे २० हजारांची मागणी केली होती.लाभार्थ्याला लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी त्यांनी संपर्क केला होता.पंचायत समिती इमारतीत गटविकास अधिकारी यांच्या दालनात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ.राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक दिलीप साबळे मारुती पंडीत, पोलीस उप अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पोना भीमराव जिवडे, पोना दिगंबर पाठक, चालक पोलीस शिपाई थिटे यांच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.

.jpg)