बसपाच्या वतीने ९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिवस डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौकात साजरा करण्यांत आला , ह्या वेळी धरती आबा वीर बिरसा मुंडा व फुले, शाहू, तसेच बोधीसत्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुण आदिवासी म्हणजे कोण? हे सांगण्यात आले, आदी म्हणजे अतिप्रचाणी काळापासुन व वास म्हणजे रहिवास , जांच्या अतिशय प्राचीन काळापासुन रहिवास आहे ते म्हणजे आदिवासी जे लोक आदि पासुन रहिवासी आहेत ते खरे आदिवासी तसेच ह्या वेळी महामानवांचे योगदान , विचार सरणी सांगण्यात आली , व फक्त जल्लोशात आदिवासी दिवस साजरा करुण वा जयंती साजरी करुण चालणार नाही ,तर आपल्याला ह्या महापुरूषांच्या विचारांचा भारत निर्माण करण्याची , आवश्यकता आहे तरच भारत हा महाशक्ती देश म्हणुन ओळखला जाईल, व ह्या महापुरूषांच्या विचार सरणवर चालणारी वा ह्या महापुरूषांची चळवळ चालवणारी, आज एकमेव पाटीॅ म्हणेजच बहुजन समाज पाटीॅ आहे, म्हणुन आदिवासी बांधवांनी बसपा साथ देवा, बसपा मजबुत करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे सांगण्यात आले. हा कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक व अध्यक्ष सचिन बाविस्कर चोपडा विधानसभा अध्यक्ष व युवराज बारेला जि महासचिव तथा ( महोरद ग्रामपंचायत सदस्य) प्रमुख उपस्थिती ईरफान तडवी विधानसभा उपअध्यक्ष रुपचंद भालेराव शहर अध्यक्ष संजय अहिरे जेष्ठ कार्यकर्ता वा माजी विधानसभा प्रभारी तसेच अनिल वाडे जि बीव्हीफ संयोजक
विजय रुपवते ,सेक्टर अध्यक्ष
अशोक मायके , गजाणन बारेला ,
मिलींद सोनवणे सेक्टर अध्यक्ष ,
प्रशांत बाविस्कर , सुरदास अहिरे,
समाधान बाविस्कर महासचिव , सलीम तडवी, शकील तडवी ,
संदिप मगरे, तुषार सिरसाठ ,
राहुल लोहार अविनाश बागुल ,संदिप साळुंके , बळीराम बारेला इत्यदी कार्यकर्ता पदाधिकारी व सर्व समाज बांधव ह्या वेळी उपस्थित होते .
