प्रतिनिधी जळगाव
जळगाव- जम्मू-काश्मीर येथील उधमपूर येथे कर्तव्य बजावत असताना जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी या गावातील जवानास वीरमरण आले. नायब सुभेदार विपीन खर्चेअसे वीरमरण आलेल्या जवानाचे नाव आहे. खर्चे यांचा आज (सोमवार) मोटासायकल दरीत कोसळून अपघाती मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्यातर्फे देण्यात आली आहे.
आजरात्री उशिरा त्यांचे पार्थिव निमखेडी गावात पोहचणार आहे. उद्या मंगळवारी दि. ९ रोजी त्यांच्या गावी सकाळी ८.३० वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. निमखेडी येथील मूळ रहिवासी विपीन खर्चे हे सध्या भारतीय सैन्यदलात नायब सुभेदार पदावर कार्यरत होते. त्यांच्या निधनाने निमखेडी गावात शोककळा पसरली आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी बुद्रूक विपीन जनार्दन खर्चे हे यांच बारावीपर्यंत शिक्षणगावातच झाले. त्यानंतर ते लगेचच २ फेब्रुवारी २००० मध्ये सैन्य दलात भरती झाले. विविध ठिकाणी त्यांनी सैन्यदलात सेवा बजावली. आग्रा येथे असतांना वर्षभरापूर्वीच त्यांची नायब सुभेदार या पदावर पदोन्नती झाली होती. दरम्यान, त्यांचा सेवेचा कालावधी संपलेला होता. मात्र त्यांनी देशसेवेसाठी पुन्हा आपला कालावधी वाढवून घेतला होता.
गावातून सैन्य दलात भरती होणारे ते पहिलेचे सूपूत्र विपीन खर्चे यांच्या पश्चात आई इंदुबाई,पत्नी रुपाली व दोन मुले सोरा वय ७ वर्ष व मुलगा आरव वय ५ वर्ष तसेच दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. विपीन हे घरात एकुलते एक होते. तसेच गावातून सैन्य दलात भरती होणारे ते पहिलेचे सूपूत्र होते. दरम्यान महिनाभरापूर्वी विपीन खर्चे यांच्या पत्नी रुपाली यांचा भाऊ आजारी असल्याने विपीन खर्चे हे सुटी घेवून घरी आले होते.ती भेट त्यांची शेवटचीच ठरली.

