प्रतिनिधि वैजापूर भारती कदम
विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित भागीरथी माध्यमिक विद्यालय नालेगाव येथे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालायाचे प्राचार्य बी. एम. हजारे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून संचालक दत्तात्रय सुरासे, क्रीडाशिक्षक बी. यू. निंबाळकर उपस्थित होते. अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आपल्या अध्यक्षीय भाषणात हजारे बी. एम. यांनी विदर्थ्यांना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील भवर यांनी केले. तर आभार सागर राजपूत यांनी मानले
या प्रसंगी राजेश्वर विभुते,गणेश जगताप, प्रमोद रिंढे, त्र्यंबक गावडे, मनीषा उभेदळ, भारत भोपळे, योगेश शिंदे, जयश्री बोर्डे , गोकुळ पवार, सुरज साळवे यासह शिक्षकेतर कर्मचारी सुनील बोडखे, किशोर साळूंके, ज्ञानदेव तायडे, विशाल साबळे उपस्थित होते.

