Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

कॉग्रेसतर्फे वैजापुरात सत्याग्रह आंदोलन



कॉग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सक्त वसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावुन चौकशीसाठी बोलावल्याच्या निषेधार्थ वैजापूर शहर व तालुका कॉग्रेस समितीच्या वतिने तहसिल कार्यालयाच्या आवारात मंगळवारी भर पावसात सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. तालुका कॉग्रेस समितीचे अध्यक्ष प्रशांत  सदाफळ यांच्या नेतृत्वाखाली तालुका कॉग्रेस, युवक कॉग्रेस, कॉग्रेस सेवा दल व कॉग्रेस अल्पसंख्यांक सेलचे कार्यकर्ते व पदाधिकारी सकाळी तहसिल कार्यालयाच्या आवारात जमा झाले व त्यांनी शांततापुर्ण मार्गाने सत्याग्रह आंदोलनास सुरुवात केली.‌ केंद्रातील मोदी सरकार हे यंत्रणांचा दुरुपयोग करुन सुडबुद्धीने सोनिया गांधीविरुद्ध कारवाई करत आहे असा आरोप करत कॉग्रेस त्याचा निषेध करत असल्याचे आंदोलकांनी सांगितले. या आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, शहराध्यक्ष काझी मलिक, विनायक गाढे, रोहित आहेर, विकिराज सोमवंशी, राजु मगर, प्रवीण जाधव,भगवान भोकरे, साहेबराव पडवळ, सुनील कुंदे, मधुकर साळुंके, बाबासाहेब गायकवाड, शिवनाथ मापारी, राजेंद्र बागुल, सोनु पोटे, बाबासाहेब पगारे, दिगंबर वाघचौरे, संजय बागुल, सुदामसिंह छानवाल आदींनी सहभाग नोंदवला.