दिपक देशमुख मेहकर.
पांगरखेड ते बेलगाव रोडचे कामाला सुरुवात करण्यात आली मात्र रोड सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले अद्यापही डांबरीकरण करण्यात आले नाही नुसत्या बारिक गोटयाचा चुरा टाकण्यात आला शेतकरी यांना बाजार पेठ मध्ये माल विकण्यासाठी जाण्यासाठी दिकत होत आहे मात्र संबंधित ठेकेदार कोण व तो रोड वर कामाकडे लक्ष केंद्रित नसल्याने मजुरुने नागरिक यांना उभा करुन काम पाहत आहे कि काय असं नागरिक यांच्या म्हणणे आहे काही ठिकाणी डांबरीकरण करण्यात आले
मात्र साइटच्या सुलपा भरल्या नसल्याने साईटला वाहण पडु शकते औ निकृष्ट दर्जाचे काम सुरू आहे गावामधुन सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले मात्र सिमेंट जास्त न वाटल्याने रोडच्या मधोमध मोठ मोठ्या भेगा पडल्या आहेत काही ठिकाणी पुलाचे काम केले नाही नुसत्या नळकांड्या पडलेल्या आहेत अता उन्हाळा सुरू होत आहे रोडच्या कडेला मोठ मोठे दगड पडलेले आहेत एखादी नागरिक गाडी घेऊन पडला तर त्याचा जिव जाऊ शकतो संबंधित ठेकेदार याकडे मेहकर चे रोड अभियंता यांनी लक्ष वेधले पाहिजेत घात पात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न नागरिक उपस्थित राहून करित आहे

