डॉ. मनोज भागवत यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मिळवली मराठी विषयातील पीएच.डी. पदवी.
निजामपूर - साक्री तालुक्यातील जैताणे येथील सामान्य शेतमजूर कुटुंबातील मनोज बापू भागवत यांनी जिद्द, कष्ट व आपल्या अभ्यासू वृत्तीच्या जोरावर मराठी विषयातील पीएच.डी. पदवी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून मिळवली. डॉ. मनोज भागवत यांनी निजामपूर जैताणेच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला आहे.
निजामपूर-जैताणे ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन वाणी पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक डॉ. मनोज भागवत यांनी 'धुळे जिल्ह्यातील कोकणी समाजाच्या लोकवाङ्मय आणि लोकबोलीचा समाजभाषावैज्ञानिक अभ्यास' या विषयावर शोधप्रबंध विद्यापीठात सादर केला होता. त्यांना ग. तू. पाटील महाविद्यालय नंदुरबार येथील प्रा. डॉ. प्रकाश भामरे यांचे मार्गदर्शन लाभले. डॉ. मनोज भागवत यांचे यापूर्वी विविध मासिकातून शोधनिबंध प्रकाशित झालेत तसेच विविध वृत्तपत्रातून व्यक्तीविशेष सदर लिहले आहेत.
डॉ.मनोज भागवत यांच्या यशाबद्दल संस्थाध्यक्ष लक्ष्मीकांत शाह, प्राचार्य नरेंद्र तोरवणे, राजेश बागुल, गोकुळ पाटील, तुषार खैरनार, डॉ. जितेंद्र चिंचोले, वैभव देवरे, डॉ. सुधाकर जाधव, डॉ. सुलतान पवार, डॉ. मनोज शेवाळे, प्रा. रवींद्र सुर्यवंशी, वाघापुरचे उपसरपंच रवींद्र देवरे, दिनेश माळी, पंकज सोनवणे, गोकुळ देवरे, सतीश बाविस्कर, धुळे जिल्हा माळी समाज यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

