Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

मलकापुर महावितरणचा भोंगळ कारभार संपूर्ण गाव घेते आकोडे टाकून वीज



मलकापूर प्रतिनिधी प्रदीप इंगळे

        मलकापुर तालुक्यातील ग्राम हिंगणा काजी येथे जवळ जवळ प्रत्येक घरामध्ये वीज तारेवर आकोडे टाकुन वीज वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. एकीकडे महावितरण कडून जे सर्व सामान्य नागरिक इमानदारीने वीज बिल भरणा करतात त्यांना अव्वाच्या सव्वा वीज बीले देऊन सक्तीची वसुली केल्या जाते परंतु जे असे अवैध पणे वीज वापर करतात त्यांना या भागातील वीज कर्मचारी यांचे अभय कसे हा प्रश्न उपस्थित होतो.

         वीज वितरण अधिकारी व कर्मचारी यांचे अर्थपुर्ण दुर्लक्ष तर नाही ना हा विचार नियमित वीज बिल भरणाऱ्या वीज ग्राहकांना पडतो. अवैध वीज वापरल्याने इमानदारीने वीज वापरणार्यांचे होणार्या आर्थिक भुर्दंडाला जबाबदार कोण हा प्रश्न जनतेत चर्चिल्या जात आहे. याकडे महावितरणच्या अधिकार्यांनी लवकरात लवकर लक्ष घालण्याची जनतेची  मागणी होत आहे.