Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

घिर्णी येथील 35 वर्षीय शेतकऱ्यांची विष प्राशन करून आत्महत्या.

 


 मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे


    मलकापूर तालुक्यातील 35 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना 1 जून रोजी तालुक्यातील घिर्णी घटना येथे घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे की विजय किसन गव्हाड राहणार घिर्णी त्यांच्याकडे दोन एकर शेती आहे. या शेतीवर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. गेल्या काही वर्षापासून बँक ऑफ महाराष्ट्राचे 54 हजार रुपये कर्ज काढले होते मात्र शेतीत पैसा गुंतवणूक करून सुद्धा अपेक्षित यश मिळत नसल्याने त्यांना कर्जाची परतफेड करता आली नाही. 

   त्यामुळे कर्जाची रक्कम वाढत गेली आणि प्रेरणी तोंडावर आल्याने त्यांच्याकडे पुरेसे पैसे नव्हते त्यातच कर्जही वाढले असल्याने आता घर कसे चालवायचे असा प्रश्न त्यांना पडला त्यामुळे 28 मे रोजी त्यांनी शेतात विष प्राशन करून आत्महत्या केली. ही बाब रस्त्याने जात असल्या शेतकऱ्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तात्काळ मलकापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अकोला येथे रेफर करण्यात आले मात्र 1 जून रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात भाऊ पत्नी तीन मुली असा परिवार आहे.