Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शेतरस्त्याच्या वादावरून केला शेतकऱ्यांचा खून ३ महिलांना अटक



नांदुरा प्रतिनिधी

    नांदुरा शेतरस्त्याच्या वादावरून बाप लेकांनी व नातेवाईकांनी मिळून चुलत्याचा कुऱ्हाड, चाकू, लाकडी दांडक्याने खून केला. काल, २५ मे रोजी सकाळी नांदुरा तालुक्यातील वडाळी शिवारात ही घटना घडली असून पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी ३ महिलांना अटक केली आहे. पेरणीच्या तोंडावर शेतरस्त्यावरून वाद होण्याच्या घटना दरवर्षी जिल्ह्यात घडतात. मात्र हा वाद थेट जीवावरच उठल्याने खळबळ उडाली आहे. 

    विशेष म्हणजे या घटनेत खून करणारे हे मृतकाचे नातेवाईक आहेत. रवींद्र सुखदेव सरदार (६५, वडाळी, ता. नांदुरा) असे खून झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रवींद्र सरदार यांचा त्यांच्या भावासोबत व नातेवाईकांसोबत शेतरस्त्यावरून जुना वाद होता. घरासमोरील नळावर पाणी भरण्यावरून सुद्धा त्यांच्यात वाद झाला होता मात्र तो मिटविण्यात आला होता. दरम्यान काल, सकाळी रवींद्रसिंग सरदार शेतात जात असताना त्यांचा त्यांच्या नातेवाईक आरोपींशी वाद झाला.